धारावीत रिक्षा, दुचाकींसह पादचाऱ्यांना मोटारीची धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

धारावी - वांद्य्राच्या दिशेने निघालेल्या मोटारीने रिक्षा, तीन दुचाकींसह पाच पादचाऱ्यांना धडक दिली. मुकुंदनगर येथील प्रियंका बारसमोरील संत रोहिदास मार्ग येथे हा अपघात झाला. ध्रुवी जैन (वय 19) ही तरुणी मोटार चालवत होती. जैन ही धारावी मार्गे वांद्य्राच्या दिशेने निघाली होती.

मुकुंदनगर येथील वाय जंक्‍शन येथे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. ब्रेकऐवजी तिने एक्‍स्लेटर दाबल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातानंतर पोलिसांनी ध्रुवीला अटक केली होती; पण नंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला. सीसी टीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे.

Web Title: accident crime

टॅग्स