मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू; कलाकारांचा समावेश

प्रमोद पाटील
रविवार, 20 ऑगस्ट 2017

या अपघातामध्ये मृत्यू झालेले गगनदीप कंग आणि अर्जित लवाणिया है दोघेही सीने कलाकार असून अन्य एका व्यक्तीचा मृतांमधे समावेश आहे. गुजरात धील उंबरगांव येथे सोनी कलरद्वारा शूटिंग करिता गेले असताना मुंबईकड़े परतत असताना हा भयंकर अपघात झाला.

सफाळे : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर मनोरजवळील चिल्हार फाटा येथे माउंटेन हॉटेलसमोर शनिवारी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कंटेनरवर मागून कार आदळून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की कारमधील प्रवास करणारे दोन सिने कलावंतासह एका सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्यातील मनोर येथे माउंटेन हॉटेलजवळ हा भीषण अपघात झाला असून अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एमएच 02 बीझेड 6998 असा या फियाट लीनिया गाडीचा नंबर असून हे प्रवाशी गुजरात उंबरगांवकडून मुंबईकड़े परतत असताना हा अपघात झाला. कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या अपघातामध्ये मृत्यू झालेले गगनदीप कंग आणि अर्जित लवाणिया है दोघेही सीने कलाकार असून अन्य एका व्यक्तीचा मृतांमधे समावेश आहे. गुजरात धील उंबरगांव येथे सोनी कलरद्वारा शूटिंग करिता गेले असताना मुंबईकड़े परतत असताना हा भयंकर अपघात झाला.

गगनदीप हा महाकाली सीरियलमध्ये इंद्राची भूमिका बजावत होता तर अर्जित हा नंदीची भूमिका करत होता. गगनदीप याने या पूर्वी ह्यूज देअर आणि सनम हम आपके है या सिनेमामध्ये भूमिका बजावली आहे. तर हनुमान सिरियलमध्ये केसरी आणि विभीषणाची भूमिका केली आहे, तर अर्जित लवाणिया यांनी सुद्धा महाकालीमधे नंदी आणि इतर मालिकांमध्ये काम केले आहे. सदर अपघाताची मनोर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तिन्ही मृतदेह शवविछेदन करिता मनोर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
       दरम्यान दोन कलवंतांची ओळख पटली असून तिसऱ्या सहकार्याची ओळख अजूनही पटलेली नाही.
अधिक तपास मनोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अक्षय सोनावणे करित आहेत.

Web Title: accident on mumbai-ahmedabad highway, 3 dead