पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात; एक जण ठार तर तीन जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

पनवेल : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. रविवार (ता.१) सकाळी ४.४५ च्या सुमारास पनवेल पासून नऊ किलोमीटर दूर कोण गाव परिसरात गाडी मध्ये कुलंट टाकण्यासाठी थांबलेल्या गाडीला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हि घटना घडली असून धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

अंधेरी येथे राहणारे राम धावरे (४०) आणि त्यांचे आठ मित्र दोन वेगवेगळ्या वाहनातून हनुमानजयंती निमित्त माणगाव येथील गावी गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास ते गावावरून मुंबईच्या दिशेने परतत असताना गाडीचे इंजिन गरम झाल्याने कुलंट टाकण्यासाठी मार्गाच्याकडेला त्यांनी गाडी उभी केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेली दुसरी गाडीही जवळच उभी करण्यात आली. या वेळी दोन्ही गाड्यांचे पार्किंग लाईट सुरु असतानाही पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक चालकाला अंदाज न आल्याने त्याने सर्वात प्रथम मागे उभ्या असलेल्या आय ट्वेंटी गाडीला धडक दिली आणि नंतर तिच्या पुढे असलेल्या शेरवालेट बिट गाडीला धडक दिली. यामध्ये राम धावरे हे जागीच ठार झाले असून संजोग पवार हे गंभीर जखमी तर महादेव कोकरे, सूर्यकांत बामगुडे हे जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एम जि एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पी एस आय पवार करत आहेत.

Web Title: accident at mumbai pune expressway