पाली-खोपोली मार्गावर पाच गाड्या आदळल्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पाली : पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर खुरावले फाट्याजवळ शनिवारी (ता.11) विचित्र अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेतील ट्रकचालकाने गाडी थांबवण्यासाठी ब्रेकऐवजी ऍक्‍सिलेटरवर पाय दिला. त्यामुळे पुढे असलेल्या कारला जोरदार धडक बसली. नंतर त्या कारच्या धक्‍क्‍याने पुढील तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. 
ट्रकची जोरदार धडक बसलेली कार दुसऱ्या कारला धडकली. 

नंतर दुसरी कार तिसऱ्या कारला धडकली आणि तिसऱ्या कारची समोर उभ्या असलेल्या एसटीला धडक बसली. हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी ट्रक चालकाला गाडीबाहेर काढले, तेव्हा त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. नागरिकांनी त्याला विचारणा केली असता दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे त्याने सर्वांसमोर कबूल केले. या अपघाताची खबर मिळताच पाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. 

Web Title: accident on pali khopoli road