कंटेनर-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

कंटेनर-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरमध्ये तालुक्‍यातील लोहारमाळ येथे एका ढाब्याजवळ थांबलेल्या कंटेनरला भरधाव स्कुटीची शनिवारी दुपारी २ वाजता धडक बसली. या अपघातात खडपी येथील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलादपूर तालुक्‍यातील खडपी गावातील अमित रघुनाथ शिंदे (वय २५) व गणेश रघुनाथ शिंदे (वय ३३) हे कामानिमित्त महाड येथे आले होते. काम आटोपून पुन्हा खडपी गावी मुंबई-गोवा महामार्गावरून परतत असताना लोहारमाळजवळील भरपूरसिंग ढाब्याजवळ आले असता तेथे थांबलेल्या कंटेनरला त्यांच्या दुचाकीची मागून धडक बसली. ही धडक कंटेनरच्या लोखंडी गर्डरला बसल्याने दुचाकीवरील अमित व गणेश हे दोघे भाऊ जखमी झाले. अपघातानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. अमित गंभीर जखमी असल्याने त्याला महाड येथे हलवण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com