सायन - पनवेल महामार्गावर शिवनेरीला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची व्हॉल्वो शिवनेरी बस सायन-पनवेल महामार्गावर पलटी झाली. या अपघातात पाच प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

सायन - पनवेल महामार्गावर पुणे - मुंबई शिवनेरी बसचा अपघात झाला. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सानपाडा रेल्वे स्थानकासमोर ही दुर्घटना घडली. पुणे-मुंबई बस ब्रीजच्या डिव्हायडरला धडकून गाडी पलटी झाली. रात्री 11 : 45 च्या सुमारास स्कूटर चालकाला वाचवताना बस पुलाच्या दुभाजक ओलांडून पलटी झाली.

गाडीमध्ये 20 प्रवासी होते. कोणतीही जीवितहानी झाली नाही. 5 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचार करून घरी पाठवले असल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क आधिकाऱ्यांनी सांगितली.

Web Title: accident of shivneri on sian panvel highway