Mumbai News : वरळी सी फेसवर भीषण अपघात; महिलेचा जागी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident on Worli sea face woman died on spot one injured mumbai police

Mumbai News : वरळी सी फेसवर भीषण अपघात; महिलेचा जागी मृत्यू

मुंबई : वरळी सी फेस येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव आहे. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला आहे.

याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय चालकाला अटक केली आहे. सुमेर मर्चंट असे आरोपी चालकाचे नाव असून तो ताडदेव येथील रहिवासी आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे. सुमेर मर्चंटला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने दारूचे सेवन केले होते का ते तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला चालत होती. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामळे मोटरगाडी या महिलेला धडकली. त्यानंतर गाडी तेथील दुभाजकालाही धडकली.

मोटरगाडी महिलेला मागून धडकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महिला दूरवर फेकली गेली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून महिलेला मृत घोषित केले. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.