
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावरील वळणावर बाईकरायडरला वळणाचा अंदाज न आल्याने बाईक उड्डाणपुलाच्या कठड्याला ठोकून खाली पडला.
कासा ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावरील वळणावर मुंबईच्या दिशेने जात असताना आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास फिल्मी स्टाईलने वेगवान बाईक चालवणारा बाईकरायडरला वळणाचा अंदाज न आल्याने बाईक उड्डाणपुलाच्या कठड्याला ठोकून खाली पडला.
या अपघातात बाईकस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या बाईकस्वाराचे नाव सिद्धेश परब (22, रा. मिरा रोड) असे आहे. त्याच्या गाडीवर मागे बसलेला सनद यादव (24) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच दुसऱ्या अपघातात महालक्ष्मी ते आंबोली दरम्यान आणखी एक बाईकरायडर मनीष राऊत (38, रा. सफाळे) याचादेखील अपघातात मृत्यू झाला. त्याच्या बाईकला ट्रेलरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
मुंबई पालघर रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
खालापुरातील 20 वर्षीय युवती बेपत्ता
खालापूर : परिचारिका प्रशिक्षण माहितीसाठी पुण्याला जाते सांगून खालापुरातील माडप येथून गेलेली ऊर्मिला लहू वाघ (20) ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी खालापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. पुण्याला पोहचल्यानंतर तिने मैत्रिणीला फोन करून पुण्यात पोहचल्याचे सांगितले होते. त्यानंतर ऊर्मिलाचा संपर्क तुटला होता. तिचा मोबाईल बंद येत असल्याने पालकांनी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली; परंतु तपास लागला नाही. अखेर तिच्या वडिलांनी खालापूर ठाण्यात तक्रार दिली आहे. निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Accidental death of a biker on Mumbai-Ahmedabad highway One was seriously injured
------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )