विद्यार्थ्यांच्या छळाचा प्राध्यापिकेवर आरोप

Crime
Crime

मुंबई - भायखळा येथील जे. जे. समूह रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. राजश्री काटके यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याचा आरोप निवासी डॉक्‍टरांची संघटना "मार्ड'ने केला आहे. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) तक्रार करण्यात आली असून, राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांतही असे प्रकार होत असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. काटके या वैद्यकीय विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करत असल्याची तक्रार "मार्ड'ने केली आहे. स्वतःची बॅग विद्यार्थ्यांना उचलण्यास सांगणे, खरेदीचे पैसे विद्यार्थ्यांना द्यायला लावणे, असे प्रकार त्या करतात. नकार दिल्यास त्याला विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्‍यात आणण्याची धमकीही दिली जाते, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. डॉ. काटके यांच्या विरोधातील तक्रारीच्या चौकशीसाठी समिती स्थापन करावी, कामासाठी योग्य असल्याबाबत त्यांची मानसिक तपासणी करावी, त्यांची तातडीने बदली करावी, तसेच परीक्षक म्हणून नियुक्त करू नये, राज्याच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार सुपूर्त करावी आदी मागण्या "मार्ड'ने केल्या आहेत.

प्रतिक्रिया
डॉ. राजश्री काटके यांच्या विरोधातील तक्रारींची दखल घेऊन चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, जे. जे. समूह रुग्णालय

या आरोपांचे मी खंडन करते; हा माझी बदनामी करण्याचा कट आहे. तक्रारदार विद्यार्थ्यांचे आरोप चुकीचे आहेत. अहवाल आल्यानंतर मी अब्रुनुकसानीचा दावा करीन.
- डॉ. राजश्री काटके, प्राध्यापक, स्त्रीरोग विभाग, जे. जे. समूह रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com