Mumbai : अश्लील व्हिडिओ पाठवून 25-30 महिलांचा विनयभंग करणारा;पुण्यातून अटकेत

या प्रकरणातील आरोपीने महिलांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ कॉल करून व फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे.
molested women making obscene video calls sending photos
molested women making obscene video calls sending photossakal

मुंबई - महिलांना अश्लील व्हिडिओ पाठविणाऱ्या आरोपीस मालाड पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. 27 वर्षीय ज्योतिराम मन्सूरे असे अटक आरोपीचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी आहे.

या प्रकरणातील आरोपीने महिलांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ कॉल करून व फोटो पाठवून त्यांचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार या प्रकरणात मालाड पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला.

मालाड पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबर वरून तपास सुरू केला. मोबाईलच्या तांत्रिक तपासावरुन पाहिजे आरोपीचे लोकेशन हे इंदोरी, जिल्हा पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार मालाड पोलीसांचे पथक पुण्यात दाखल झाले.

स्थानिक पोलिसांची मदत घेत आरोपी ज्योतीराम बाबूराव मन्सूळे यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने या प्रकरणातील तक्रारदार महीलेप्रमाणेच इतर 25 ते 30 महिलांना वेगवेगळे मोबाईल क्रमांकावरून

व्हाट्सअप वापरून व्हिडीओ काॅल केल्याचे तसेच अश्लील मेसेजेस पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मालाड पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com