Mumbai Crime News : अनेक राज्यात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपी अटकेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accused involved in crime of burglary arrested police action maharashtra gujrat

Mumbai Crime News : अनेक राज्यात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपी अटकेत...

मुंबई : महाराष्ट्र आणि गुजरातमधील घरफोड्या सारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 22 वर्षीय तरुणाला मुंबईत अटक करण्यात आली आहे. मोहम्मद आफताब कासिम खान असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातला असून सध्या गुजरात मध्ये सुरतेस आरोपी वास्तव्यास होता. आरोपीकडून पोलिसांनी 7.46 लाख रुपये रोख आणि 50.34 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी पोलिसांनी गुरुवारी रात्री जिजामाता नगर येथे तपासणीदरम्यान या व्यक्तीला पकडले. आरोपी मोटारसायकल चालवत होता आणि पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी भरूच आणि बडोदा येथून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्रातील चोरी आणि घरफोडीच्या विविध गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग आहे.ओळख टाळण्यासाठी आरोपी कोणतेही कागदपत्र आपल्याजवळ ठेवण्याचे टाळत असल्याची शक्कल आरोपीने लढवली होती.

महाराष्ट्र आणि गुजरातमधील घरफोड्यांमध्ये सहभागी असलेल्या २२ वर्षीय तरुणाला मुंबईत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. सुरत येथील रहिवासी असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 7.46 लाख रुपये रोख आणि 50.34 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींनी भरूच आणि बडोदा येथून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलिसांनी सांगितले.