"सनबर्न'मध्ये स्फोटाचा होता कट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंबई - नालासोपारा स्फोटके प्रकरणातील आरोपींना पुण्यात होणाऱ्या "सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये स्फोट घडवून आणायचा होता, असा दावा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सत्र न्यायालयात केला. 

शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्याकडून सनबर्नमध्ये स्फोट घडवण्याचा कट रचला जात होता. जालन्यातून अटक केलेला श्रीकांत पांगारकर यासाठी आर्थिक मदत करणार होता, असेही एटीएसने सत्र न्यायालयात सांगितले. दरम्यान, या आरोपींसह वैभव राऊतच्या पोलिस कोठडीत 3 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

आरोपींच्या हिट लिस्टवर असलेल्या देशभरातील सहा व्यक्तींची नावे न्यायालयात सादर करण्यात आली. यात सीबीआयच्या नंदकुमार नायर यांचा समावेश असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. 

Web Title: Accused in Nalasopara explosives case planned blast in Sunburn festival