जुन्या नोटांप्रकरणी आरोपींना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - अंधेरीत पकडलेल्या चार कोटी 93 लाखांच्या जुन्या नोटांप्रकरणी तीन आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अविनाश राव, अब्दुल्ला अब्दुल माजिद शेख, एस. कृष्णमूर्ती अशी त्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मरोळ परिसरातील हॉटेलमध्ये विशेष पथकाने गुरुवारी ही कारवाई केली होती. अविनाश राव हा काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये राहत होता. त्याला भेटण्यासाठी अब्दुल्ला आणि कृष्णमूर्ती आले होते. 500 आणि एक हजारच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
Web Title: accused police custody for old currency