लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

मुंबई : पुण्यातील 10 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी फेब्रुवारी 2014 मध्ये विशेष न्यायालयाने राजेंद्र भीमराव असुदेव याला 10 वर्षांचा कारावास ठोठावला होता. या शिक्षेविरोधात त्यांने उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र न्यायालयाने 31 जुलैला दिलेल्या निकालात हे अपील फेटाळले आहे. 

भादंवि आणि पॉक्‍सो कायद्याअंतर्गत आरोपीवर ठेवलेले गुन्हे न्यायालयाने मान्य करत दोषी ठरविले होते. या आरोपात आपल्याला नाहक गुंतविले असून, सदर पिडित कुटुंबियांचे स्थानिक नेत्याशी असलेल्या संबंधामुळे खोटे आरोप ठेवल्याचे असुदेव याने म्हटले होते. संबंधित राजकीय नेत्याशी आपले वैर असल्याने, त्याचा बदला घेण्यासाठी असा बनाव रचून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही अपीलात नमूद होते. मात्र, हे दावे उच्च न्यायालयाने अमान्य केले आहेत. 

Web Title: The accused of sexual harassment continued to be punished