धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आरोपीची आत्महत्या

धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आरोपीची आत्महत्या

मूर्तिजापूर (अकोला) : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने चिखली गेटजवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. यामध्ये आरोपीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.23) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

उस्मानाबाद शहर पोलिसांनी दत्तात्रय दगडूबा खोसे (वय55) (रा. दहीफळ ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यास एका प्रकरणात अटक केली. हा आरोपी मनोरूग्ण असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमधून नागपूरला मनोरूग्णालयात पोलिस बंदोबस्तात नेल्या जात होते. यादरम्यान रेल्वे स्थानकापासून चार किमी अंतरावरील चिखली पुलाजवळ गाडी पोचली असताना लघुशंकेचे कारण सांगून धावत्या गाडीतून त्याने उडी घेतली.

रेल्वेखाली येऊन सकाळी आठच्या दरम्यान त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेह पुलाच्या दोन कठड्यांमध्ये अडकून पडला होता. न्यायाधीश आणि पोलिस घटनास्थळी पोचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com