स्कूल बस विरोधात कारवाई 

स्कूल बस विरोधात कारवाई 

वाशी - नवी मुंबईमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने राबवलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या तपास मोहिमेत नवी मुंबईमध्ये 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 12 बस जप्त करण्यात आल्या. त्यांच्याकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान राबवलेल्या या विशेष मोहिमेत नवी मुंबईतील नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे व एमआयडीसी या भागात वाहने तपासण्यात आली होती. त्यात या स्कूल बस व व्हॅनकडून नियमांचे पालन, वाहनांमध्ये महिला सहकारी, वाहनांचा शाळेबरोबर करार, उपलब्ध आसनांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक, विमा प्रमाणपत्र तपासणी व परवान्याची वैधता अशा अनेक बाबी तपासण्यात आल्या. या विशेष तपास मोहिमेत परवानाधारक स्कूल बस व व्हॅन मिळून 155 वाहनांची तपासणी करण्यात आली. यात 15 दोषी स्कूल वाहने आढळून आली. त्यापैकी 12 स्कूल बस उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्या. या विशेष तपास मोहिमेत स्कूल बसकडून सुमारे 46 हजार 500 रुपयांची रोख रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

शाळेचे विद्यार्थी व शाळा यांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी तसेच अवैध स्कूल बस व स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक यावर निर्बंध घालण्यासाठी या विशेष तपास मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 15 दोषी वाहने समोर आली असून त्यापैकी 12 वाहने जमा करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ही तपास मोहीम पुढे सुरू ठेवण्यात येणार असून अवैध आढळणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com