ग्रॅच्युईटी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयांना न्‍यायालयाची चपराक

File Photo
File Photo

मुंबई : तेरणा इंजिनियरिंग महाविद्यालयाला कामगार न्यायालयाने दणका दिला आहे. तेरणा इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये शैलेश नांदगावकर यांनी प्राध्यापक म्हणून ११ वर्षे सेवा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आपली ग्रॅच्युईटी मिळण्यासाठी त्यांनी महाविद्यालयाकडे अर्ज केला होता. परंतु, त्याला विलंब होत असल्याने नांदगावकर यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.

न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून नांदगावकर यांना दोन लाख १० हजार ५१ रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम व त्यावर १० टक्के व्याज देण्याचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालामुळे नांदगावकर यांना दिलासा मिळाला असला तरी नांदगावकर यांच्याप्रमाणे अनेक शिक्षकांना इंजिनियरिंग महाविद्यालयाकडून त्यांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com