अमली पदार्थांचा पुरवठा करणारा अटकेत; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

दिनेश गोगी
मंगळवार, 25 जून 2019

उल्हासनगर : अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. त्यांच्या कडून 4 किलो गांजा आणि अमली पदार्थांचा समावेश असलेल्या 144 सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. 

उल्हासनगर : अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. त्यांच्या कडून 4 किलो गांजा आणि अमली पदार्थांचा समावेश असलेल्या 144 सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभुमीवर कारवाई करण्यात आली.  नेवाळी मधील डावलपाड्यात राहणारा एका इसमाच्या घरातून गांजा व नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरपच्या बॉटल्सचा पुरवठा करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंघाने काल सायंकाळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटिल, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे, विशाखा झेंडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, उदय पालांडे, सुरेंद्र पवार, रमजु सौदागर, रामचंद्र जाधव, गुरुनाथ जंगम, जावेद मुलानी, विट्ठल पदमेरे, बाबूलाल जाधव, दादासाहेब भोसले यांनी नेवाळी डावलपाडा येथील एका घरावर छापा टाकला. गुलाम सरवार मकसूद अहमद खान याला ताब्यात घेऊन घराची झाडाझडती घेतली असता 4 किलो गांजा व नशा येणाऱ्या रेक्रोस, फेनक्रेस या सिरपच्या 144 बॉटल्स जप्त केल्या.
 

आरोपी गुलाम सरवार मकसूद अहमद खान याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 29 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडून विशेषताः रेक्रोस व फेनक्रेस या नशा आणणाऱ्या सिरपच्या बॉटल्सची माहिती घेण्यात येणार. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिरपच्या बॉटल्सचा कोण पुरवठा करतो? तरुणाईला या सिरपच्या आहारी लावण्यात आले आहे काय? याची कसून विचारपूस केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action by Crime Investigation Police on drug users