वाडा - चिंचघर ग्रामपंचायतीची धडक कारवाई 

दिलीप पाटील
शुक्रवार, 4 मे 2018

वाडा : तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कुडूस ते चिंचघर या काँक्रीटीकरणाच्या टप्प्यात चिंचघर गावात काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण होते ते दूर करताना संबंधितांचा प्रखर विरोध होता. परंतु ग्रामपंचायतीने विकासाच्या कामात हितसंबंध बाजूला ठेवून कठोर भूमिका घेऊन कारवाई करून अतिक्रमण दूर केले. त्यामुळे आता हा रस्ता रूंद झाला असून यामागेॅ जाणाऱ्या परिसरातील गावच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

कुडूस ते गौरापूर या 12 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 9 कोटींचा 40 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.पैकी कुडूस ते चिंचघर हा1300 मीटरचा रस्ता काँक्रीटचा आहे. गेले वर्षभर हे काम रखडले होते. चिंचघर येथील ह.वि.विद्यालय व नॅशनल इंग्लिश स्कूल या दोन शैक्षणिक संकुलातील सुमारे 7 हजार विद्यार्थी या मार्गावरून रोज प्रवास करताना. त्यांना होणारा त्रास आणि कामातील दिरंगाई याबद्दल दोन्ही शैक्षणिक संस्था तसेच कुडूस व चिंचघर ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे सतत निवेदने प्रत्यक्षभेटी घेऊन आंदोलनाचे इशारे दिल्यावर या रस्त्याचे काम सुरू झाले.

दरम्यान, चिंचघर गावात मध्यवर्ती ठिकाणी रस्त्याच्या कामात काही अडथळे होते ते दूर करताना संबंधितांचा प्रखर विरोध होता. परंतु रस्ते विकासात हितसंबंध बाजूला ठेवून या योजनेच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन चिंचघर ग्रामपंचायतीचे सरपंच संकेत नांगरे उपसरपंच नामदेव भोईर व कमिटीने धडक कारवाई केली. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व यामागेॅ जाणाऱ्या परिसरातील गावचे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीतआहेत.  

तसेच कुडूस ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात  200 मीटर रस्त्याच्या कामातील हरकतीबाबत  कुडूस ग्रामपंचायतीनेअंदाजपत्रकाप्रमाणे काम  होईलअशी सहकार्याची भूमिका घेऊन तसे लेखी पत्र कार्यकारीअभियंता यांना दिले आहे.  

Web Title: action on encroachment by chinchghar grampanchayat