क्षय रुग्णांची माहिती न दिल्यास कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - अनेक खासगी रुग्णालयांत क्षयरोगावरील उपचारांबाबत गुप्तता पाळली जाते. अशा रुग्णालयांना आरोग्य विभागाने समज दिली आहे. क्षय रुग्णांची माहिती दिली नाही; तर कडक कारवाईला केली जाईल, अशी तंबी राज्य क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सतीश पवार यांनी दिली. केंद्र सरकारच्या "निक्षय' या संकेतस्थळावर क्षय रुग्णांची माहिती द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे. माहिती न दिल्यास प्रथम नोटीस दिली जाईल आणि नंतरही टाळाटाळ केल्यास कारवाई केली जाईल, असे डॉ. पवार म्हणाले.
Web Title: Action if no information about TB patients is given