...तर खासगी डॉक्टरांवर कारवाई, केडीएमसी आयुक्तांचा इशारा

सुचिता करमळकर | Monday, 10 August 2020

सात हजारांहून अधिक ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ही तपासणी न झाल्याने संशयित कोव्हिड रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याची भीती असते.

कल्याण : खासगी डॉक्‍टरांकडे येणाऱ्या तापाच्या रुग्णांची ऍन्टिजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे; मात्र कल्याण-डोंबिवलीतील खासगी डॉक्‍टर ही टेस्ट न करता तापाच्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी यापुढे अशी टेस्ट न केल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. 

नक्की वाचा : व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले; सणासुदीच्या काळात ग्राहकांनी फिरवली पाठ

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात आतापर्यंत सात हजारांहून अधिक ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ही तपासणी न झाल्याने संशयित कोव्हिड रुग्णाची प्रकृती गंभीर होण्याची भीती असते. अशा रुग्णांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते.

महत्वाची बातमी : गर्भवती कोरोनाबाधित असेल तर हा आहे मोठा धोका! ऑक्सफर्डच्या अंतस्त्रावशास्त्र शाखेचा अभ्यास, काळजी घेण्याचे आवाहन 

परिणामी पालिका क्षेत्रातील मृत्युदरात वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या तापाच्या सर्व प्रकारच्या रुग्णांची टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. अशी टेस्ट न केल्यास संबंधित खासगी डॉक्‍टरांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

action if private doctors treat patients without antigen tests