केडीएमटीची दांडीबहाद्दर वाहक-चालकांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) दांडीबहाद्दर वाहक-चालकांची संख्या वाढत असल्याने उत्पन्न घटत असून 100 हून अधिक दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील 15 ते 20 वाहकचालकांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणी प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि त्यांचे सहकारी वाहतूक निरीक्षक यांना बुधवारी (ता.9) "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिला आहे. 

केडीएमटी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केडीएमटीत 297 वाहक, 214 चालक आहेत. खासगी ठेकेदाराचे 12 ते 15 कर्मचारी आहेत. केडीएमटीच्या कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचारी नसल्याने तेथे काही कर्मचाऱ्यांचा वापर होत असल्याने वाहतूक विभागाला 190 वाहक आणि 190 चालक मिळतात. कधी बस असतात, तर कधी कर्मचारी नसतात. यामुळे केडीएमटीचे उत्पन्न घसरत चालल्याने केडीएमटी प्रशासनाने 100 हून अधिक वाहक-चालकांना त्वरित कामावर हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्याला कोणी प्रतिसाद न देता बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी हजर झाल्यामुळे सभापती सुभाष म्हस्के आणि परिवहन समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी अहवाल मागितला होता. त्यानुसार आज कारवाई झाली. 

Web Title: Action on kdmt bus driver & conductor