सरबत विक्रेत्यांवर सोमवारपासून धडक कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

मुंबईत 87 टक्के सरबताचे नमुने दूषित असल्याचे आढळून आल्यामुळे रोगराईचा संभाव्य धोका ओळखून पालिकेचे आरोग्य खाते सतर्क झाले आहे. सोमवारपासून सरबत आणि बर्फ गोळा विक्रेत्यांविरुद्ध विभागवार कारवाई सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

संबंधित वृत्त
87 टक्के सरबत, बर्फाचे गोळे घातक

मुंबई - मुंबईत 87 टक्के सरबताचे नमुने दूषित असल्याचे आढळून आल्यामुळे रोगराईचा संभाव्य धोका ओळखून पालिकेचे आरोग्य खाते सतर्क झाले आहे. सोमवारपासून सरबत आणि बर्फ गोळा विक्रेत्यांविरुद्ध विभागवार कारवाई सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

कुर्ला रेल्वेस्थानकातील अस्वच्छ सरबत प्रकरणानंतर महापालिकेने घेतलेल्या मुंबईतील तपासणी मोहिमेत 596 नमुन्यांत तब्बल 87 टक्के सरबत, बर्फाच्या गोळ्यांमध्ये दूषित घटक असल्याचे आढळून आले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना रस्त्यात कुठल्याही स्टॉलवर सरबत मिळतो. तहान भागवण्यासाठी सरबत, उसाचा रस किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. मात्र, ते आरोग्याला अपायकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उकाड्याच्या दिवसांत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ला स्थानकात अस्वच्छ ठिकाणी सरबत बनवतानाचा प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वेस्थानकातील सरबतांचे स्टॉल बंद करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्यांवर सरबत आणि बर्फाचे गोळे सर्रास विकले जात आहेत. कुर्ला येथील प्रकरणानंतर मुंबई महापालिकेने मुंबईत तपासणी मोहीम राबवली. विभागवार घेतलेल्या नमुन्यांमध्ये तब्बल 87 टक्के सरबत, बर्फ, उसाचा रस पिण्यास आरोग्यास घातक असल्याचे आढळले. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. येत्या सोमवारपासून पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांत कारवाई करणारी पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: action from Monday on the syrup vendors