esakal | न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगर पालिकेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगर पालिकेची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : एकीकडे ठाण्यात (Thane) बेकायदा फलकांवरुन ठाण्यात रणकंदन माजलेले असतानाच न्यायालयाच्या (Court) आदेशानंतर ठाणे पालिकेने (Municipal) सोसायटीच्या दर्शनी भागात लावलेला जाहिरात फलक काढला आहे.

जांभळी नाका येथे आत्माराम टॉवर नावाची एक इमारत आहे. या इमारतीच्या दर्शनी भागातील पहिल्या मजल्यावर मे. स्पार्क इंटरप्रायझेसचे मालक चैतन्य शिंदे यांनी डिजीटल जाहिरात फलक उभारला होता. हा फलक उभारण्यासाठी सदर सोसायटीची कोणत्हाी प्रकारची परवानगी घेतली नव्हती. अनेकदा पालिकेकडे तक्रारी करुनही फलक हटविला जात नसल्याने सोसायटीच्या सदस्यांनी अ‍ॅड. वी.टी. हुंदलानी आणि अ‍ॅड निलेश पुंड यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या आधारे सन 2019 च्या अखेरीस न्या. इंदलकर यांनी हा जाहिरात फलक हटविण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: ‘अलबत्या-गलबत्या’ची भारतीय टपाल विभागानं घेतली दखल

मात्र, सोसायटीच्या सदस्यांनी पाठपुरावा करुनही फलक हटविण्यात येत नव्हता. अखेर या खटल्यात काम पाहणारे अ‍ॅड. वी.टी. हुंदलानी आणि अ‍ॅड निलेश पुंड यांनी न्यायालयाचा अवमान होत असल्याची बाब ठामपा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मारुती खोडके हा फलक हटविण्यात आला, अशी माहिती आत्माराम टॉवरचे सक्रेटरी हरमन संजना यांनी दिली. दरम्यान, हा फलक हटविण्यात आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

loading image
go to top