Mumbai : मुंबईतील 90 वर्ष जुन्या 'बॅचलर्स'वर कारवाईची टांगती तलवार; बॅचलर्सचे मालक हैराण

पोलीस प्रशासनाकडून पालिकेला पत्र
Action on 90-year-old Bachelors food center in Mumbai traffic jam issue mumbai police
Action on 90-year-old Bachelors food center in Mumbai traffic jam issue mumbai policesakal

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'बॅचलर्स ' या फूड सेंटरवर कारवाई करण्यात संदर्भात मुंबई पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहिले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई महापालिकेला या स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी पत्रात केली आहेत. जवळजवळ 90 वर्ष जुने ' बॅचलर्स' हे स्टॉल कम उपहारगृह मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर स्थित आहे.

अनेक वर्षांपासून ग्राहक गिरगाव चौपाटीवर बॅचलर मध्ये बसून स्वादिष्ट पिझ्झा सँडविच सारख्या फास्टफुडचा किंवा ज्यूसचा आस्वाद घेत छान वेळ घालवतात. मात्र आता पोलिसांच्या पत्रानंतर यावर गदा येण्याची शक्यता आहे. या सर्व घटनाक्रमात स्टॉलचे मालक हैराण झाले आहेत.

पोलीसांचे पत्र

मुंबई पोलिस परिमंडळ 2 च्या उपायुक्तांनी मुंबई महापालिकेच्या डी वार्डच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात वाहतूक गिरगाव चौपाटी येथील 'बॅचलर्स' स्टॉलचा महापालिकेने दिलेला परवाना रद्द करून त्यावर तोडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतुकीत कोणतीही अपघात होऊ नये यासाठी सदर स्टॉलवर कारवाई करण्याचे पत्रात लिहिले आहे. या स्टॉल लगतचा जाणारा रस्ता हा व्हीआयपी रूट असल्यामुळे तसेच नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळणे गरजेच असून परिणामी स्टॉलवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्टॉल लगतच्या रस्त्यावर होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेतर्फे याबाबत अजून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. या पत्रा संदर्भात महापालिकेकडून अद्याप मुंबई पोलिसाना उत्तर मिळालेले नाही.

'कोस्टल रोडमुळे कोंडी ' मालकांचा दावा

मुंबई पोलिसांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहिल्याचे माहिती मिळताच बॅचलर्सचे मालक आदित्य अगरवाल याना मात्र धक्का बसला आहे. पोलिसांनी पत्रातून दिलेल्या कारणांचे त्यांनी खंडन केले आहे. स्टॉल समोर होणाऱ्या पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होत नसून येथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं दावा आदित्य अग्रवाल यांनी केला आहे.

तसेच गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह या भागात देशातून परदेशातून मोठ्या संख्येने प्रवासी भेट देत असतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी हे रोजच जनजीवन असल्याचं आदित्य अगरवाल सांगतात. अजूनही कारवाई संदर्भात आदित्य अग्रवाल यांना प्रशासनाकडून नोटीस मिळाली नाही परंतु या घटनेमुळे स्टॉलवर आपला उदर निर्वाह करणाऱ्या अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

90 वर्षापासूनची परंपरा

आदित्य अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅचलर्स 1932 साली त्यांच्या आजोबांनी सुरू केले. आता आदित्य अग्रवाल आणि त्याचा बंधू ही अग्रवाल कुटुंबीयांची तिसरी पिढी हा स्टॉल चालवत आहे. आदित्य अग्रवाल यांच्या आजोबांनी त्या काळात भारतात पहिलं 'चिली आईस्क्रीम ' बनवले. खवय्यांना चिली आईस्क्रीमने भुरळ घातली आणि पाहता पाहता बॅचलरची प्रसिद्धी चढत्या क्रमाने होत गेली. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत बॅचलर्सच आपलं एक योगदान आहे

ब्रिटिश अधिकाऱ्याकडून कौतुक

बॅचलर्स ने सेलिब्रिटी असो सामान्य माणूस असो की अगदी उच्च पदस्थ परदेशी अधिकारी सर्वांनाच भुरळ घातलेली आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात ब्रिटिश ब्रिटनचे भारतात नियुक्त राजदूत ॲलेक्स एलिस एनी बॅचलर्सला भेट दिली होती. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी चिली आईस्क्रीमचा आस्वाद घेतला होता.सोशल मीडियावर त्यांनी माहिती देत मुंबईकर बनून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याची माहिती एलिस यांनी दिली होती.

"आम्ही महापालिकेकडे वेळेत कर भरतो. कधी त्यात कर चुकवेगिरी करत नाही. कोणतेही जागा बेकायदेशीर रित्या आम्ही वापरत नाही. अशा परिस्थितीत जर ही कारवाई करण्यात आली तर मी आणि माझा कुटुंबाने काय करायचं हा प्रश्न आता मला पडला."

- आदित्य अग्रवाल, बॅचलर्सचे मालक

"या स्टॉलला लागून असलेला रस्ता व्हीआयपी रूट आहे तसेच स्थानिक नागरिकांनी वारंवार या वाहतूक कोंडी संदर्भात तक्रारी पोलीस प्रशासनाकडे दिल्या होत्या. परिणामी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्टॉलवर कारवाई करणे गरजेचे आहे"

- सत्यनारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त (कायदा,सुव्यवस्था)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com