Mumbai: वर्षभरात साडे तीन हजारपेक्षा जास्त चेन पुलिंगच्या घटना

१९८० रेल्वे प्रवाशांवर कारवाई शेकडो रेल्वे गाडयांना लेटमार्क
Railway
Railway esakal

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या वर्षभरात ३ हजार ४२४ चेन पुलिंगचा घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामधून १ हजार ,९८० रेल्वे प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ९ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड आकाराला आहे.

साधारणता दररोज ९ ते १० चेन पुलिंगचा घटना घडत असल्याने लोकल सेवा आणि मेल- एक्सप्रेस गाडयांचा वेळापत्रकावर मोठा परिणाम दिसून येत आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात प्रवाशांसाठी अलार्म चेन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा ट्रेन थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याश्या कारणासाठी ही चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले.

Railway
Mumbai : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल कॅशलेस पद्धतीने करा ; सत्यजीत तांबे

त्यामुळे रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर, २०२२ या वर्षात ३ हजार ४२४ अलार्म चेन पुलिंगचा घटना घडल्या आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये एकूण १ हजार ९८० प्रवाशांवर कारवाई केली आहे.

या कारवाईत त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.या चालू वर्षात १ जानेवारी, २०२३ ते १० मार्च, २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ७७८ अलार्म चेन पुलिंग प्रकरणे नोंदवली गेली आणि ६६१ प्रवाशांवर कारवाई करण्यात येऊन ४.५४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

रेल्वेचे प्रवाशांना आवाहन-

अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग सहारा घेऊ नका ज्यामुळे इतरांची गैरसोय होईल. अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे.

कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्थानकारव पोहोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com