विरारमध्ये वाळूमाफियांवर कारवाई ; 43 ट्रक, 1 जेसीबी जप्त

विरारमध्ये वाळूमाफियांवर कारवाई ; 43 ट्रक, 1 जेसीबी जप्त

नालासोपारा : वैतरणा बंदरावर वाळूउपसा करण्यास बंदी असताना वाळूमाफियांकडून अनधिकृत वाळूउपसा सुरूच आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांनी उंबरपाडा रस्त्यावर शनिवार वाळूमाफियांवर कारवाई केली. या कारवाईत 43 ट्रक, 1 कार, 1 जेसीबी असा 4 कोटी 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

विरारच्या हद्दीत चिखलडोंगरी, खार्डी, शिरगाव, वैतरणा चांदीप, उसगाव, खाणीवडे, हेदिवडे, चिमणे, नारंगी, तानसा आणि कोसिबे असे 12 रेतीबंदरे आहेत. या बंदरांवर वाळूमाफियांकडून वाळूउपसा सुरूच होता. या वाळूउपशामुळे वैतरणा आणि शिरगाव रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे. वैतरणा खाडीतून वाळूउपसा करून खाणीवडे ते उंबरपाडा रस्त्यावरून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरूच होती. शासकीय वाहने या रस्त्याने येऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खड्डे पाडण्यात आले आहेत; तसेच रेतीच्या गाडीची ओळख पटू नये यासाठी गाड्यांच्या नंबर प्लेटवर चिखल, वंगण, ग्रीस लावले जाते. 

नव्यानेच हजर झालेले पालघरचे पोलिस अधीक्षक सिंह यांनी स्वतंत्र पथक सोबत घेऊन खाणीवडे ते उंबरपाडा या रस्त्यावर असणाऱ्या वाळूच्या ट्रॅकवर कारवाईची मोहीम राबविली. या वेळी वाळूमाफियांनी कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाळूमाफियांनी सात ट्रक पळवून नेले. तर 43 ट्रक, 1 कार, 1 जेसीबी असा 4 कोटी 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. आरोपींवर सह पर्यावरण संरक्षण अधिनियम, जमीन महसूल अधिनियम, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com