esakal | राज्यात 375 खासगी बसेसवर कारवाई; कर आणि दंडातून 5 लाख 59 हजार रूपयांच्या महसुलाची कमाई
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात 375 खासगी बसेसवर कारवाई; कर आणि दंडातून 5 लाख 59 हजार रूपयांच्या महसुलाची कमाई

दिवाळीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे वसूली करण्याच्या कारणावरून 69 खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात 375 खासगी बसेसवर कारवाई; कर आणि दंडातून 5 लाख 59 हजार रूपयांच्या महसुलाची कमाई

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई ता.18 : दिवाळीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे वसूली करण्याच्या कारणावरून 69 खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपासून राज्यभरात 2195 वाहनांची तपासणी केली असून, त्यामध्ये 375 वाहने दोषी आढळले आहे. यामध्ये सर्वाधीक जागा भाडे वसूली करण्याच्या खासगी बसची संख्या नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण विभागातील आहे.

रेल्वेची राज्यातील काही फेऱ्या कोरोना माहामारीच्या पार्श्वभुमीवर रद्द आहे. त्याशिवाय जनरल डबे काढण्यात आले असून फक्त आरक्षन निश्चित असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. वेटिंग असलेल्या प्रवाशांना प्रवास नसल्याने, अनेकांनी एसटी, खासगी बस वाहतूकीचा पर्याय निवडला आहे. मात्र, खासगी बस वाहतूकदारांकडून याचा फायदा घेऊन जादा भाडे वसूली करत असल्याने, परिवहन आयुक्त अविनाश ढाकने यांनी अशा बसेसवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाची बातमी "मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल पण तो भाजपचाच, बाळासाहेबांच्या संघर्षासाठी उभे राहू." - फडणवीस

यामध्ये जादा भाडे वसूली, बसची लांबी वाढवणे, सीटर स्लीपर मान्यतेपेक्षा जास्त वाढवलेल्या बसेस या प्रकारात 13 नोव्हेंबरपासून राज्यभरात कारवाईची मोहिम राबवून तब्बल 375 खासगी बसवर कारवाई केली असून, 13 बसची लांबी वाढवल्याने आणि सीटर स्लीपर मान्यतेपेक्षा जादा वाढवल्याने 5 बसेसवर सुद्धा कारवाई केली आहे.

महसुलाची कमाई :

13 नोव्हेंबरपासून खासगी बस वाहतुकदारांवर कारवाईची मोहिम हाती घेतल्यानंतर राज्यभरात 2 लाख 53 हजार 919 रूपयांची करवसूली तर 3 लाख 15 हजार 100 रूपयांची दंडवसूली असे एकूण 5 लाख 69 हजार 19 रूपयांचा महसुलाची कमाई राज्य परिवहन विभागाने केली आहे.

महत्त्वाची बातमी :  पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक! मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार

13 नोव्हेंबर पासून केलेली कारवाई

विभाग - तपासलेली वाहने - दोषी वाहने - जादा भाडे घेणे

 • मुंबई - 264 - 26 - 1
 • ठाणे - 217 - 56 - 8
 • पनवेल - 329 - 28 - 0
 • कोल्हापूर - 212 - 24 - 0
 • पुणे - 231 - 35 - 0
 • नाशिक - 254 - 34 - 9
 • धुळे - 109 - 43 - 0
 • औरंगाबाद - 103 - 21 -  2
 • नांदेड - 168 - 12 - 7
 • लातूर - 36 - 0 - 0
 • अमरावती - 104 - 25 - 3
 • नागपूर शहर - 79 - 57 - 28
 • नागपूर ग्रामीण - 89 - 14 - 11 
 • एकूण - 2195 - 375 - 69  

action taken against 375 private buses fine worth 5 lac 59 thousand collected by state government