तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली.

तुर्भे विभागात अतिक्रमणविरोधी पथकाने सेक्‍टर 18 येथील हॉटेल दिल्ली दरबार या हॉटेलवर कारवाई करत अनधिकृत केलेले वाढीव बांधकाम व पत्रा शेड काढण्यात आले. याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात आली होती; मात्र त्यांनी या नोटिशीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर सर्व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईपोटी 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत सेक्‍टर 19 डी येथील हॉटेल वन ऍण्ड वन कल्टवरही अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडूनही 50 हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. या अतिक्रमणविरोधी मोहिमेत 25 कामगारांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अनधिकृत बांधकामांवरील कारवाई येत्या काळात प्रभावीपणे सुरुच राहील, असेही सांगण्यात आले. 
 

Web Title: Action on unauthorized constructions in Turbhe division