अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

ठाणे - मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत जाहिराती, होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ उपायुक्तांची नोडल व संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

यापूर्वी नोडल ऑफिसर म्हणून सहायक आयुक्तांची नियुक्ती केली जात होती. त्यात आता बदल करून उपायुक्तांची नियुक्ती केली आहे; मात्र अधिनियम व नियमातील तरतुदींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची जबाबदारी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांची असणार आहे, असे महापालिका आयुक्तांच्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यापुढे घोषणा फलक, जाहिरात, पोस्टर्स, होर्डिंगसाठी परवानगी देताना परवानगीचा क्रमांक, परवानगीचा कालावधी, ठिकाण आदी बाबी ठळकपणे दिसतील अशा प्रकारे जाहिराती, घोषणाफलक, पोस्टर्सवर छापण्यात याव्यात. ज्या जाहिरातींवर या बाबी छापल्या नसतील त्या तत्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. त्याचे छायाचित्र संबंधित पोलिस ठाण्याला पाठवावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Action on unauthorized hording