रंगकर्मींच्या धूलिवंदनाला पोलिसांचा आक्षेप

रंगकर्मींच्या धूलिवंदनाला पोलिसांचा आक्षेप

मुंबई - मराठी कलाकारांच्या धूलिवंदन उत्सवाला मुंबई पोलिसांनी सुरवातीला आक्षेप घेतला. मात्र, परवानगीचे पत्र दाखविताच पोलिसांनी उत्सवाला परवानगी दिली. या प्रकाराबद्दल कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"रंगकर्मी' संस्थेतर्फे शिवाजी पार्क येथील बीएमसी मैदानात अमेय खोपकर, श्रीरंग गोडबोले, पुष्कर श्रोत्री, अभिजित पानसे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, जयवंत वाडकर, सुशांत शेलार आदी मंडळीतर्फे धूलिवंदन उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही उत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी पोलिसांची परवानगीही घेतली होती, तरीही पोलिसांनी शिवाजी पार्क आणि परिसर शांतता क्षेत्र असल्याने मोठ्या आवाजातील स्पीकरला मनाई असल्याचे सांगत हरकत घेतली. मात्र, परवानगीचे पत्र दाखविताच पोलिसांनी माघार घेतली.

मराठी कलाकार नेहमीच पोलिसांना सहकार्य करतात. पोलिसांच्या कार्यक्रमाला मराठी कलाकार नेहमीच जातात. त्यामुळे परवानगी घेऊनही पोलिसांनी आक्षेप घेतल्याने आश्‍चर्य वाटते. ही राजकीय होळी नव्हती, तर मराठी कलाकारांची होळी होती. त्यामुळे पोलिसांनी खोडा घालायला नको होता.
- अमेय खोपकर, निर्माता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com