अभिनेता इरफान खानला ग्रासले, 'न्यूरो इंडोक्राइन ट्युमर'ने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

'न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर' हा आजार मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. या आजारानेच इरफानला ग्रासले आहे. याबाबतची माहिती इरफानने स्वत: दिली आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता इरफान खानला 'न्यूरो इंडोक्राइन ट्युमर' या गंभीर आजाराने ग्रासले आहे. याबाबतची माहिती स्वत: इरफानने ट्विटरवर एक पोस्ट करून दिली. या आजारावरील उपचारासाठी तो लवकरच परदेशात जाणार आहे. 

Irfan khan

'न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर' हा आजार मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. या आजारानेच इरफानला ग्रासले आहे. याबाबतची माहिती इरफानने स्वत: दिली आहे. ट्विटरवर त्याने एक ट्विट केले असून, यामध्ये त्याने लिहिले, की ''काही अनपेक्षित घटना आपल्याला मोठे होण्यास मदत करतात. असेच माझ्याबाबत झाले आहे. न्यूरो इंडोक्राइन ट्युमर झाल्याचे माहिती होणे हे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. पण आमच्या आजूबाजूला असणाऱ्यांचे प्रेम व मला मिळालेले प्रोत्साहन या सगळ्यातून मला आशेचे नवे किरण दिसले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावे लागणार आहे. पण तुमच्या शुभेच्छा अशाच सुरू ठेवा'', असे ट्विट त्याने केले आहे.  

Web Title: Actor Irrfan Khan has Diagnosed Neuroendocrine Tumour