कंगना राणावत मुंबईतल्या घरी दाखल, विमानतळावर आरपीआय-शिवसेना भिडली

पूजा विचारे | Wednesday, 9 September 2020

कंगना आपल्या खार येथील घरी पोहोचली आहे.कंगनाला मुंबईत फिरु देणार नसल्याच्या घोषणा शिवसैनिक विमानतळावर देताहेत. तर दुसरीकडे रिपांईचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल झाली आहे. केंद्र सरकारनं तिला वाय प्लस सुरक्षा दिला आहे. मुंबई विमानतळावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.  कंगनासाठी शिवसेनेचा विरोध कायम आहे. विमानतळावर शिवसेनेचे कार्यकर्ते कंगनाविरोधात घोषणाबाजी करत आहे. कंगनाला मुंबईत फिरु देणार नसल्याच्या घोषणा शिवसैनिक विमानतळावर देताहेत. तर दुसरीकडे रिपांईचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत. कंगना आपल्या खार येथील घरी पोहोचली आहे.

कंगना पाकिस्तान चले जाव, कंगना राणावत हाय हाय अशा घोषणा शिवसेनेकडून देण्यात येताहेत. मुंबई विमानतळावर शिवसेना आणि रिपांईचे कार्यकर्ते आमनेसामने आलेत. कंगना राणावतला मुंबईत येण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे. तसंच कंगनाला अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. 

 

कंगनाच्या ट्विटची मालिका 

कंगनानं काही तासापूर्वी तीन ट्विट केले. आपल्या ऑफिसलला राम मंदिराची उपमा दिली. तर बीएमसीची तुलना बाबराशी केली असून अभिनेत्रीनं पुन्हा एकदा पाकिस्तानचा उल्लेख केला आहे. 

 

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाचं अनधिकृत म्हणत नोटीस बजावली होती. त्यानंतर कंगनाकडून पालिकेला दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नसल्याचं पालिकेनं म्हटलं आणि पाली हिल परिसरात असलेल्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. पालिकेनं ११ च्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केली आणि पोलिसांच्या बंदोबस्तात तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. 

 

यावेळी कंगनानं तीन ट्विट केलं. पहिल्या ट्विटमध्ये तिनं आपल्या कार्यालयाला राम मंदिराची उपमा दिली. त्या ट्विटमध्ये तिनं लिहिलं की, मणिकर्णिका फिल्म्स'मध्ये 'अयोध्या'ची घोषणा केली होती. ही माझ्यासाठी एक इमारत नाही तर राम मंदिरच आहे, आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होईल, राम मंदिर पुन्हा पडणार. पण लक्षात ठेव बाबर हे मंदिर पुन्हा बनणार, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल, हे मंदिर पुन्हा बांधले जाईल जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम.

आणखी एका ट्विटमध्ये कंगनानं पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर केला. या फोटोवर तिनं बाबर आणि त्याचे सैन्य असं कॅप्शन दिलं आहे. यात तिनं #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. 

तिसऱ्या ट्विटमध्येही तिनं पाकिस्तान असं लिहिलं लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केली. याआधी कंगनानं  मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या कारवाईनंतर तिनं थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे. 

Actor Kangana Ranaut arrives at Mumbai Residence with high security