अभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

पूजा विचारे
Friday, 8 January 2021

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कंगनाविरोधात वांद्रे पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. कंगनाविरोधात वांद्रे पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून कंगनाची चौकशी होणार आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाही नोटीस बजावण्यात आली. 

कंगनाविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295 ए आणि 153 ए या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र कंगना वैयक्तिक कारणास्तव चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली. त्या नोटीशीत कंगनाला २३ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. त्या नोटिशीला ही कंगनानं प्रतिसाद दिला नाही.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्याच दरम्यान गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. तसंच कंगनाची फक्त दोन तासच चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. 
 

Actor Kangana Ranaut Bandra Police record their statements connection sedition case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Kangana Ranaut Bandra Police record their statements connection sedition case