अभिनेता किरण मुलाखतीतून आज उलगडणार कलाप्रवास 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

प्रभादेवी - चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांत अल्पावधीत रसिकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता किरण माने शनिवारी (ता. 7) मुलाखतीतून कलाप्रवास उलगडणार आहे. आपला चौथा स्तंभ ज्ञानशक्ती मंचच्या वतीने त्याच्या मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. 

मंचचा "कलाप्रवासाचा मागोवा' हा रंगतदार मुलाखतीचा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. चित्रपट आणि नाट्य समीक्षक नंदकुमार पाटील माने यांच्याशी संवाद साधणार आहेत, असे मंचचे अध्यक्ष विजयकुमार बांदल यांनी सांगितले. किरणचे परफेक्‍ट मिस मॅच हे नाटक रंगमंच गाजवत आहे. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे आणि कान्हा अशा अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. झी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांची भूमिका आहे. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे त्याच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: actor kiran mane