सावरकरांची नाटके म्हणजे साडेतीन शक्तिपीठे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

ठाणे - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेली साडेतीन नाटके मनोरंजनापलीकडील असून त्यातील मतितार्थ नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. ही नाटके म्हणजे नाट्यसृष्टीतील साडेतीन शक्तिपीठे आहेत, असे प्रतिपादन रंगकर्मी अभिनेते प्रमोद पवार यांनी केले.

गडकरी रंगायतनमध्ये २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘सावरकरांचे साहित्यविश्‍व’ या विषयावर प्रमोद पवार बोलत होते. या वेळी झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक डॉ. शरद हेबाळकर, सावरकरव्रती जयप्रकाश बर्वे आणि शंकरराव गोखले उपस्थित होते.

आजकालची नाटके वैचारिक नसतात. किंबहुना, अशा नाटकांचा समाजाला कितपत उपयोग होतो. वास्तविक सावरकरांची सन्यस्त खड्‌ग, उ:शाप आणि उत्तरकळा ही तीनच नाटके रसिकांसमोर आली असली, तरी बोधिवृक्ष हे नाटक अर्धवट राहिल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी त्यांनी काही नाटकांचे प्रवेशही म्हणून दाखवले. सावरकरांची सर्व नाटके पुन्हा रंगमंचावर आणण्याचा मानस बोलून दाखवत त्यासाठी त्यांनी मदतीचे आवाहन केले.

इतिहास अभ्यासक डॉ. हेबाळकर यांनी सावरकरांच्या आत्मचरित्रपर लिखाणातील विविध पैलू उलगडले. सावरकरांच्या ‘काळे पाणी’ आणि ‘मोवाल्यांचं बंड’ या कादंबऱ्या वाचकांना सुन्न करणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांचे साहित्यविश्‍व उत्तुंग असल्याने दोन तासांत तीन वक्‍त्यांनी बोलून भागणार नाही. त्यांच्या साहित्यावरच संमेलन भरवावे अथवा साहित्यावर दिवसभर परिसंवाद ठेवावा, अशी सूचना भारतकुमार राऊत यांनी संयोजकांना केली.

सावरकरव्रतींचा हृद्य सत्कार
ठाण्यातील स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, सावरकर प्रतिष्ठान आणि मुंबईतील सावरकर दर्शन प्रतिष्ठान आदी संस्थांतर्फे सावरकरांच्या विचारांचा आणि आचरणाचा प्रसार करणाऱ्या आठ सावरकरव्रतींचा सत्कार संमेलनात करण्यात आला. यात निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, बडोदा येथील डॉ. दामोदर नेने ऊर्फ दादुमिया, ज्येष्ठ गायक-संगीतकार वसंत आजगावकर, सावरकर समग्र वाङ्‌मयचे ग्रंथपाल नागेश कांबळे-तुळजापूरकर, सावरकर चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणारे शैलेंद्र गौड, याच चित्रपटात ब्रिटिश सुपरिटेंडंट अभिनेते मधुकर ताम्हणे, संसदेतील सावरकरांचे तैलचित्र रेखाटणाऱ्या चंद्रकला कदम आणि सावरकर साहित्य मंडळाचे अध्यक्ष शंकरराव गोखले आदींचा समावेश आहे.

Web Title: Actor Pramod Pawar statement about savarkar