Salman Khan : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण; आरोपी विरोधात लुक आऊट नोटीस जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

अभिनेता सलमान खानला ई-मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे.

Salman Khan : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण; आरोपी विरोधात लुक आऊट नोटीस जारी

मुंबई - अभिनेता सलमान खानला ई-मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्चमध्ये एका व्यक्तीने माफिया किंगपिन गोल्डी ब्रारच्या नावाने ई-मेल पाठवून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहेत.

राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशातील सर्व प्रमुख विमानतळांना या लुकआऊट सर्क्युलर नोटीसची माहिती देण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा हरियाणाचा असून तो यूकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

मार्चमध्ये धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीने मार्च महिन्यात सलमानच्या जवळच्या मित्राला गोल्डी ब्रारच्या नावाने धमकीचा ईमेल पाठवून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सलमानच्या मित्राने पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.

नोटीसचा परिणाम

सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीचीही माहिती देण्यात आली आहे. त्याच्या लुक आऊट सर्कुलर नोटिसमुळे आता जेव्हा जेव्हा आरोपी परदेशातून विमानतळावरून भारतात प्रवेश करतो किंवा देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला विमानतळावरच ताब्यात घेतले जाऊ शकते. त्यानंतर त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली जाईल. अखेर त्याने सलमान खानला धमकी कशी दिली आणि कोणाच्या सांगण्यावरून त्याने असे कृत्य केले, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस सखोल तपास करत आहेत.