
सोनू सूदने इमारतीमध्ये केलेल्या अंतर्गत बांधकामावर नुकताच मुंबई महापालिकेकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : आज मुंबईत अभिनेता सोनू सूद याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज झालेली भेट ही सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी झाली असं सोनुने म्हटलंय. त्याचप्रमाणे कोविड काळात केललेल्या कामाची माहितीही आपण शरद पवार यांना दिल्याचं सोनू सूदने म्हटलंय. गेल्या काही दिवसात सोनू सूद आणि मुंबई महापालिका यांच्यातील रहिवाशी इमारतीतमध्ये कमर्शिअल वापरावरून सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला. त्यानंतर आज शरद पवार यांची सोनुने घेतलेली भेट वेगळं काहीतरी सूचित करत असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायत. सोनू ने शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली.
महत्त्वाची बातमी : माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार मूर्तिकार आणि कारागिरांना केंद्राचा दिलासा
Mumbai: Actor Sonu Sood paid a courtesy visit to NCP chief Sharad Pawar at the latter's residence today. pic.twitter.com/xTh8wpE9Bs
— ANI (@ANI) January 13, 2021
सोनू सूदच्या बांधकामावर नुकताच मुंबई महापालिकेकडून आक्षेप घेण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान सोनू सूद सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार असल्याचं समजतंय.
मुंबईतील सर्व महत्त्वाच्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Read all latest marathi news from mumbai
BMC आणि सोनूत नेमका काय आहे वाद ?
सोनुविरोधात BMC कडून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे की, मुंबईतील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डिंग मुंबई महापालिकेला न माहिती देता हॉटेलमध्ये रूपांतरित केली. शक्ती सागर ही एक निवासी इमारत असून त्याचा कमर्शियल वापर करता येऊ शकत नाही. महाराष्ट्र रिजन अँड टाऊन प्लॅनिंग ऍक्ट कलम ७ अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असल्याचंही BMC चं म्हणणं आहे. इमारतीच्या मुळ आराखड्यात बदल करणे, इमारतीचा काही भाग वाढवणे आणि त्याचा वापर करण्याचे आरोप सोनू सुदवर केले आहेत.
याबाबत सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली होती. BMC कडून जमिनीच्या मालकी हक्काच्या हस्तांतरणाची परवानगी घेतली आहे. दरम्यान आता महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथॉरिटीकडून परवानगी मिळणे बाकी आहे. BMC कडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडांनही सोनू ने केलं आहे.
Actor Sonu Sood paid a courtesy visit to NCP chief Sharad Pawar at silver oak