ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे आज (शुक्रवार) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

विजय चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आजारावर मात करत, ते घरी परतले होते. काल पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचे बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली होती. विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होते. 

मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर, हयवदन यांसारखी अनेक नाटके विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. सिनेमा क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीचा मोठा कालावधी विजय चव्हाण यांनी पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदानही दिले. चव्हाण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Web Title: actor Vijay Chavan passed away