सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

पूजा विचारे
Saturday, 15 August 2020

सुशांत आपली एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्या घराचे हफ्ते भरत होता. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. दरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडेनं हे आरोप फेटाळून लावलेत.

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ईडी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीचे अधिकारी सध्या सुशांतच्या जवळच्या लोकांशी चौकशी करत आहेत. त्यातच एक धक्कादायक बाब समोर आली होती ती म्हणजे, सुशांत आपली एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्या घराचे हफ्ते भरत होता. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. दरम्यान अभिनेत्री अंकिता लोखंडेनं हे आरोप फेटाळून लावलेत.  या बातमीचं खंडन करुन आरोप करणाऱ्यांसमोर अंकिता लोखंडेनं पुरावा सादर केला आहे. 

एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या घराचे हप्ते सुशांत भरत होता, असा आरोप काही जणांनी लावला होता. यानंतर अंकितानं सोशल मीडियावर बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रे पोस्ट केली आहेत. त्यावरुन फ्लॅटचा हप्ता अंकिता स्वत: भरत असल्याचं समोर आलं आहे. घर घेताना बँकेच्या कागदपत्रावर अंकिता लोखंडेची खात्याची माहिती आहे. अंकिताने सर्व कागदपत्रे पोस्ट करत आरोप करणाऱ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. या घराची किंमत 1.35 कोटी रुपये आहे. काही वृत्तानुसार, सध्याच्या घडीला या फ्लॅटचा बाजारमूल्य सुमारे 4.5 कोटी रुपये आहे.

 

हेही वाचाः मुंबईत मंगळवारपर्यंत असा असेल पाऊस, जाणून घ्या अपडेट्स

माझ्यावर होत असलेल्या आरोपाचं मी खंडन करतेय. मी यापेक्षा पारदर्शी होऊ शकत नाही. माझ्या फ्लॅटचे रजिस्टर कागदपत्रे आणि बँक डिटेल्स. यामध्ये तूम्ही पाहू शकता.  इथे मी माझ्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आणि 1 जानेवारी 2019 पासून 1 मार्च 2020 पर्यंतच्या बँक खात्याची सर्व माहिती दिली आहे. माझ्याच खात्यामधून प्रत्येक महिन्याला ईमएमआय जातो. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. सुशांतला न्याय मिळावा, अशा प्रकारचं ट्विट अंकितानं केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

In continuation

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिता लोखंडे सध्या सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी यासाठी सोशल मीडियावर जोरदार आवाज उठवत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं सुशांतसोबत नेमकं काय घडलं? हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतची केस CBI कडे सोपवावी. #CBI for SSR” असं ट्विट सुद्धा केलं होतं.

अधिक वाचाः  मनसे आमदार संतापले, महापालिका आयुक्तांना भेट म्हणून दिली 'ही' वस्तू

अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.  सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. २०१६ला ते लग्नही करणार होते. दरम्यान २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं. अंकितासोबत ब्रेकअप केल्यानंतर सुशांत रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Actress Ankita Lokhande share bank statements reports claiming Sushant Singh Rajput paid EMI


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Ankita Lokhande share bank statements reports claiming Sushant Singh Rajput paid EMI