एक थी शेरनी...संजय राऊत यांच्या ट्विटला कंगनाचं उत्तर

पूजा विचारे
Wednesday, 4 November 2020

गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याबाबतचं ट्विट संजय राऊत यांनी केलं. त्यावर अभिनेत्रीनं राऊत यांचं ट्विट रिट्विट केलं आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईः  शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोशल मीडियावर दोघं एकमेकांवर टीका करत असतात. आता पुन्हा एकदा कंगना राणावतनं संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला प्रत्त्युत्तर दिलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. याबाबतचं ट्विट संजय राऊत यांनी केलं. त्यावर अभिनेत्रीनं राऊत यांचं ट्विट रिट्विट केलं आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने संजय राऊत यांचं ट्विट रिट्विट करत एक होती सिंहींण…आणि एक लांडग्यांचा कळप! अशी उपहासात्मक टीका केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कंगनाने एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांनी मला घरी बोलावलं आणि धमकी देऊन हृतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागण्यास सांगितलं असा दावा केला होता. कंगनाची बहिण रंगोली हिनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्टही टाकल्या होत्या. तसंच कंगनाने काहीही कारण नसताना सुशांतसिंह राजपूत प्रकरणात माझं नाव घेतलं असंही जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. यामुळे जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.

अधिक वाचाः  विना मास्क फिरणाऱ्यांसह, थुंकणाऱ्यांविरोधात BMC आक्रमक; 5 लाख जणांवर कारवाईचे लक्ष्य

Actress Kangana Ranaut reply Shiv Sena MP Sanjay Raut tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Kangana Ranaut reply Shiv Sena MP Sanjay Raut tweet