मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणं कंगनाला महागात, सोशल मीडियावर रोष

पूजा विचारे
Friday, 4 September 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करु लागले आहेत.

मुंबईः  अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका करु लागले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे, अशी टीका कंगनानं ट्विटरद्वारे केली होती. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनानं आतापर्यंत राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांवर रोखठोक भाष्य केलं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला कंगनानं नकार देत मूव्ही माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. मुंबई पोलिसांबद्दल कंगनानं केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. तसेच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने परत मुंबईत येऊ नये, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर कंगनानं हे संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नये असे म्हटले. मुंबईच्या रस्त्यांवर यापूर्वी स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असे कंगनानं ट्विट केलं होतं. 

यानंतर सोशल मीडियावर तिच्या विरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Kangana Ranaut trolled on social media for mumbai compare pok gets