आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबई सत्र न्यायालयात केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून या खटल्यातील शिक्षेवरील सुनावणी पूर्ण झाली. शुक्रवारी सत्र न्यायाधीश एस. जी. शेट्ये हे शिक्षेचा निकाल देणार आहेत.

बॉलीवूडमध्ये करिअर करण्याच्या हेतूने मुंबईत आलेल्या मीनाक्षीची २०१२ साली झालेली हत्या ही दुर्मिळ घटना आहे. मैत्रीचे नाटक करून या दोन आरोपींनी तिची क्रूररीत्या हत्या केली. अत्यंत शांत डोक्‍याने खुनाचा कट रचला गेला. मीनाक्षीच्या देहाची ओळख पटू नये यासाठी तिचे डोके धडापासून वेगळे केले. त्यानंतर तिचे धड आणि शीर दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले. पैशाच्या हव्यासापोटी अमितकुमार जयस्वाल आणि त्याची प्रेयसी प्रीती सुरीन या दोघांनी हे क्रूर हत्याकांड घडवले. हा मानवतेच्या दृष्टीने विश्‍वासघात केला असून, हा मैत्रीच्या नात्याला कलंक आहे. त्यामुळे आरोपींना फाशीपेक्षा कमी शिक्षा देऊ नये, अशी मागणी गुरुवारी सत्र न्यायालयात उज्ज्वल निकम यांनी केली.

Web Title: actress Meenakshi Thapa accused of hanging