अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी समन्स बजावूनही ठाणे न्यायालयासमोर हजर न राहणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना ठाणे न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावला आहे.

ठाणे : फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी समन्स बजावूनही ठाणे न्यायालयासमोर हजर न राहणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना ठाणे न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. त्यानंतरही त्यांनी न्यायालयासमोर येण्याचे टाळल्यास प्राजक्ता यांना अजामीनपात्र वॉरंट बजावला जाऊ शकतो, अशी माहिती मनचंदा यांचे वकील सचिन पवार यांनी दिली. 

काशिमीरा पोलिस ठाण्यात मनचंदा यांनी 5 एप्रिल रोजी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध मारहाण केल्याबद्दल अदखलपात्र तक्रार दाखल केली. त्यानंतर मनचंदा यांनी ठाणे न्यायालयात धाव घेत माळी हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयाने प्राजक्ता माळी हिला यापूर्वी दोन वेळा समन्स बजावला होता. तरीही सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्याने माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Prajakta warrants against the gardener