तनुश्री दत्ताकडून पोलिसांच्या अहवालाविरोधात न्यायालयात दावा

tanushree dutta nana patekar
tanushree dutta nana patekar

मुंबई : अभिनेता नाना पाटेकरवर विनयभंगचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता पोलिसांच्या बी समरी अहवाल विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे.

2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या चित्रिकरणा दरम्यान पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने मीटू मोहीमे दरम्यान केला होता. याबाबत तीने मागील वर्षी औक्टोबरमध्ये ओशिवारा पोलिस ठाण्यात फिर्यादही केली आहे. मात्र पोलिसांनी बी समरी अहवाल न्यायालयात दाखल करून पाटेकर यांना क्लीन चीट दिली आहे.

याविरोधात दत्ता यांच्या वतीने ऐड नितीन सातपुते यांनी अंधेरी रेल्वे मोबाईल न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला. पोलिसांच्या अहवालाला दत्ता यांनी विरोध केला आहे. न्यायालयाने यासंदर्भात पुढील सुनावणी 7सप्टेंबर रोजी निश्चित केली आहे. बी समरी म्हणजे फिर्यादीमध्ये तथ्य नसून प्रकरण बंद करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com