लॉकडाऊनमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीचे तब्बल साडेसहा लाख ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्मवर

लॉकडाऊनमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटीचे तब्बल साडेसहा लाख ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्मवर

मुंबईः कागद वाचवा, प्रिंट काढू नका डिजिटल मार्गाचा वापर करा, असे वीज कंपन्या नेहमीच सांगत असल्या तरी टेकसॅव्ही होण्याचा धडा कोरोना काळानेच ग्राहकांना दिला आहे आणि असा अनुभव अदाणी इलेक्ट्रिसिटीला येत आहे. या काळात त्यांच्या ग्राहकांना डिजिटल सेवांचा वापर साडेसहापट जास्त केला. 

या काळात अदाणीच्या साडेपाच लाख ग्राहकांनी विविध कामांसाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला. तर आणखी एक लाख ग्राहकांनी ग्राहक सेवा केंद्रात जाण्याऐवजी अदाणीच्या व्हॉट्सअॅप सेवेचा वापर केला.  गेल्या वर्षी ही एकूण संख्या जेमतेम एक लाख होती. आपल्या तक्रारी आणि सूचनांबाबत लॉकडाऊनमुळे तक्रार निवारण केंद्रात जाणे शक्य नसल्याने लोक अदाणीच्या चॅटबॉट, वेबसाईट, ट्विटर अशा डिजिटल माध्यमांकडे वळले. ग्राहकांनी त्या माध्यमातून नवी वीज जोडणी घेणे, मीटर नोंदविलेल्या नावात बदल करणे, वीजबिल पहाणे आणि भरणे, मीटर रीडींग देणे ही कामे केली. त्याखेरीज पावसाळ्यात मीटर केबिन परिसरात पाणी भरणे, वीजपुरवठा खंडित होणे, एरवीही रस्त्यांवरील दिवे बंद पडणे या तक्रारीही डिजिटल माध्यमांमार्फत करण्यात आल्या. 

गेल्या वर्षी वेबसाईटद्वारे अदाणीशी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांची संख्या फक्त 80 हजार होती. यावर्षी पावणेचार लाख ग्राहकांनी वेबसाईटमार्फत कंपनीशी संवाद साधला. चॅटबॉट इलेक्ट्रा सेवेचा वापर मागील वर्षी जेमतेम नऊ हजार लोकांनी केला तर यावर्षी हीच संख्या दीड लाख झाली. 2018 मध्ये फक्त 18 ग्राहकांनी फेसबुकच्या माध्यमातून तर आठ हजार ग्राहकांनी ट्विटरच्या साह्याने कंपनीशी संपर्क साधला.

यावर्षी फेसबुकवरून दोन हजार ग्राहक तर ट्विटरवरून 28 हजार ग्राहक अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या संपर्कात आले. ग्राहकांची सोय होण्यासाठी आम्ही यापुढेही विविध डिजिटल माध्यमांचा वापर वाढवीत राहू, असे अदाणीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. नुकतीच कंपनीने नवी वैशिष्ट्ये असलेल्या मोबाईल अॅपची सुधारित आवृत्तीही आणली आहे.

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

Adani Electricity 6 lakh 50 thousand customers digital platform in lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com