'त्या' इशाऱ्यानंतर अदानी ग्रुपचे शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; वाढीव वीजबिलांबाबत चर्चा

तुषार सोनवणे | Monday, 7 September 2020

अदानी गृपचे सीईओ आणि शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट  घेतली आहे.

मुंबई - राज्यभर वाढीव विजबिलांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाचा धसका घेत अदानी गृपचे सीईओ आणि शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट  घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनंतर 'या' बड्या नेत्यांच्या घरी खणखणले धमकीचे फोन, वाचा सविस्तर

कोरोना काळात नागरिकांना वाढीव वीजबिले देण्यात आली आहेत. मुंबईत देखील नागरिकांचा वाढीव वीज बिलांमुळे अक्रोश दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांना या बीलांमध्ये सूट द्या अन्यथा जनतेचा उद्रेक होईल आणि त्यावेळी मनसे त्यांच्या बाजूने असेल, त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल ती कोणाच्याही हातात नसेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी ही माहिती दिली.

VIDEO: लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन

राज ठाकरे यांनी अदानी गृपला वाढीव वीजबिलांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर आज अदानी गृपचे सीईओ आणि शिष्ठमंडळ राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते.

कोरोनाकाळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तसेच अनेकजणांचे पगार किंवा उत्पन्न कमी झाले असताना नागरिकांना वाढीव वीज बिलाचे भूर्दंड देणे योग्य नाही. अदानी गृपने राज्य सरकारसोबत वाटाघाटी करून तत्काळ नागरिकांना वीज बिलात सूट द्यावी. अदानी गृप व्यवसाय करीत असला तरी, कोरोनासारख्या अपवादात्मक परिस्थितीत ग्राहकांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मध्यम मार्ग काढावा अशा सूचना अदानी गृपच्या अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती नितिन सरदेसाई यांनी दिली आहे.

-----------------------------------------