मराठी भाषेसाठी जीवन वेचणारे अॅड. दातार यांचे निधन झाले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

कल्याण (मुंबई) : मराठी भाषेसाठी आपले जीवन व्यतीत करणारऱ्या अॅडव्होकेट शांताराम दातार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. न्यायालयीन प्रक्रियेत मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी दातार यांनी यशस्वी लढा उभारला होता. मुळचे इंदौरचे असलेल्या दातार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले दातार मराठी भाषा संरक्षण आणि विकास या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. वनवासी कल्याण आश्रमाचे ते पदाधिकारी होते.

अनेक बँकांचे तसेच संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्यातच मराठी भाषेची होत असलेली गळचेपी शासनाकडून मराठीविरोधी धोरणांचा केला जाणारा अवलंब या सर्व गोष्टींविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. न्यायालयीन कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा याकरिता अधिसूचना काढण्यास मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेने शासनाला भाग पाडले आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘न्यायालयीन व्यवहार आणि मराठी भाषा’ या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये दातारांचे मोलाचे योगदान आहे. दिवाणी दावा दाखल करण्यापासून तो चौकशीला न्यायालयासमोर येईपर्यंतच्या प्रक्रियेबाबतच्या मराठीमधील पुस्तकाचे ते एक प्रमुख लेखक आहेत.

दातार यांच्या निधनाने मराठी भाषा संरक्षण आणि संवर्धन चळवळीचा एक बिनीचा कार्यकर्ता आपण गमावून बसलो असून ही या चळवळीची मोठीच हानी आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना नुकतेच दक्षिणेतल्या राज्यांमधील भाषिक वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी स्थापित समितीवर घेतले होते. तिकडून आल्यावर त्यांनी दक्षिणेकडे असणारा भाषिक स्वाभिमानही वर्णन केला होता. त्यांच्या प्रयत्नांनी न्यायालयीन मराठीला मोठे बळ लाभले होते. त्यांच्या या अकस्मात झालेल्या निधनाने मराठी संवर्धन चळवळीची मोठीच हानी झाली आहे. 

श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ 

Web Title: Adding life to Marathi language datar passed away