Aditya Thackeray Ayodhya Visit: आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर

या दौऱ्यासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली असून आदित्य ठाकरे मुंबईतून निघाले आहेत.
Aditya Thackeray Ayodhya Visit
Aditya Thackeray Ayodhya Visitsakal media

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्याबद्दल प्रतिक्रियाही येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, रामलल्लाची आऱती, पत्रकार परिषद, इस्कॉन मंदिराला भेट असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. (Aditya Thackeray Ayodhya Visit)

या दौऱ्याबद्दल काल शिवसेना खासदार संजय राऊतांनी सविस्तर माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचंही नियोजन दोन वर्षांपासून करण्यात येत होतं. मात्र कोरोनामुळे हा दौरा पुढे ढकलला जात होता. हा दौरा राजकीय नाही. पण काही राजकीय नेत्यांच्या इच्छेपोटी काही जणांच्या भेटी घेणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

Aditya Thackeray Ayodhya Visit
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधीच मनसेचं ट्वीट; "सेटिंग करुन..."

अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लखनौ विमानतळापासून अयोध्येकडे जाणारे मुख्यमार्ग आणि ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहे. तसंच अनेक ठिकाणी भगवे ध्वज आणि कमानीही लावण्यात आल्या आहेत.

कसा असेल आदित्य ठाकरेंचा दिनक्रम?

सकाळी अकरा वाजता आदित्य ठाकरे हे लखनऊ एअरपोर्टला पोहचतील. दुपारच्या इस्कॉन मंदिराच्या भेटीनंतर दुपारी आदित्य ठाकरे अयोध्येत एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर हनुमान गढी आणि रामललाचे सायंकाळी दर्शन घेणार आहेत. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान लक्ष्मण किला आणि ६.४५ वाजता शरयू नदीच्या घाटावर आरतीही करणार आहे. त्यानंतर ७.३० वाजता आदित्य ठाकरे हे पुन्हा लखनऊ एअरपोर्टने परतीच्या प्रवासाला निघतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com