Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray criticize cm eknath shinde maharashtra gujrat politics mumbai

Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

मुंबई : वरळीतील बिडिडी चाळीतील लोकांचे स्वप्नपूर्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. त्यांना स्वप्नातील घर मिळवून दिली आहे. जंभोरि मैदानासाठी अडीच कोटींचा निधी दिला आहे.

वरळीतील एकही रस्ता किंवा ठिकाण नसेल जिथे माहविकास आघाडी सरकार मध्ये काम झाल नाही. त्यामुळे वरळीतील नागरिकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास आहे. मात्र, नऊ महिने होऊनही एकनाथ शिंदे सरकारचे काम दिसत नाही. दिल्लीला धावा करताहेत, विस्तार कधी होईल याची विचारणा करत आहे.

मात्र, विस्तार होण्यापूर्वीच हे सरकार कोसळणार असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तर राज्यातील प्रत्येक क्षेत्र कोलमडलं असून, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले आहे मग राज्यातले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे असा प्रश्न येत्या अधिवेशनात शिंदेंना विचारणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दक्षिण मुंबई विभागातील वरळीतील जांबोरी मैदानात शिवसैनिक निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्ता मेळाव्यातील कार्यकर्त्यांना सबोधतांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारवर गंभीर टिका केल्यात.

पुढे बोलतांना ते म्हणाले, राज्यात पोलिस भरती, एमपीएससी अशा भरती प्रक्रिया रखडल्या आहे. नियुक्त्या झाल्यावर बदलीसाठी पैसे मोजावे लागत आहे. नगरपालिकेच्या निवडणूका थांबवून प्रशासक बसवले आहे.त्यामुळे असे भयानक सरकार महाराष्ट्रालाच नाहीतर देशासाठी धोक्याचे असून या सरकारमुळे लढून मिळवलेला स्वतंत्र धोक्यात आल असल्याची टीका भाजपवर केली.

गद्दारानी पक्षाचे नाव, चिन्हं सगळ काही नेले पण आज वरळीकरानी दाखवून दिले. आमचे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. 50 खोके एकदम ओके म्हणत आदित्य ठाकरे यांची घोषणाबाजी देत सभेच्या ठिकाणी शिवसिनिकांना यावेळी भावनिक साद दिली. सगळे शिवसैनिक भायखळा,

वरळी, शिवडी, वडाळा इथलेच आहेत ना, की कोणी झारखंड वरून येऊन सभेत गर्दी केली असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली. वरळीत यापूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी होती. तर आपल्या सभेत शिवसैनिकांची गर्दी असल्याचेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले.

आधी इडीचे तर आता बिसीचे सरकार

शिंदे - फडणवीस यांचे आधी इडी सरकार तर होतेच आता बिल्डर्स आणि कॉन्ट्रक्टर्सचं सरकार झालं आहे. प्रत्येक कामांमध्ये घोटाळे सुरू आहे. मर्जीतल्या लोकांना कंत्राट दिले जात आहे. बिलो रेट मध्ये काम घेतले जात आहे. रस्ते घोटाळे उघड करून साडेचार कोटी वाचवले असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.